Breaking : मतदान केंद्रात अनधिकृतरित्या प्रवेश केला; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल!

मतदान केंद्रात अनधिकृतरित्या प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या अंगरक्षकासह १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
mla santosh bangar
mla santosh bangar संदीप नागरे

हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर अनधिकृतरित्या प्रवेश करणे शिवसेना आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या सह त्यांचा अंगरक्षक पोलीस कर्मचारी व इतर तेरा कार्यकर्त्यांविरुद्ध मतदान प्रक्रिया सुरू असताना, मतदान केंद्रात येऊन, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

औंढा (Aundha) शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील नागनाथ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला असून, रात्री उशिरा मतदान (Voting) केंद्र अधिकारी दयानंद कल्याणकर यांनी तक्रार दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आमदार संतोष बांगर हे त्यांच्या अंगरक्षकासह इतर कार्यकर्त्यांना मतदान केंद्रात घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील या तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे.

mla santosh bangar
OBC समाजाच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार : छगन भुजबळ

आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांनी मतदान केंद्रात विनापरवानगी प्रवेश करत भगव्या रंगाचे रुमाल अंगावर घेऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्‍न केल्‍याचे देखील म्हटले आहे. पोलिसांना मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या व्हिडिओत शिवसेना (Shivsena) आमदार संतोष बांगर हे चक्क मतदान केंद्रातील मतदान यंत्राजवळ जाऊन पाहणी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांनी मतदान यंत्रात छेडछाड केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी अपक्ष उमेदवार जीडी मुळे यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com