Janta Sahakari Bank : साडे तीन काेटींच्या गैरव्यवहार प्रकरणी जनता बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल

एकाच कुटूंबातील अनेक सदस्यांना बेकायदेशीर कर्ज देण्यात आले.
nandurbar
nandurbarSaamTv

- सागर निकवाडे

Nandur Bar News : नंदुरबार जिल्ह्यातील पी के अण्णा पाटील जनता सहकारी बँकेमध्ये (PK Anna Patil Janta Sahakari Bank) आर्थिक गैरव्यवहार करून तीन कोटी पन्नास लाख रुपयांची अफरातफर केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नंदुरबार येथील उपनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

nandurbar
Zilla Parishad School : गुरुजी तुमचं हे वागणं बरं नव्हं! आक्रमक ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे (पाहा व्हिडिओ)

या बँकेतील (bank) भांडवल आणि ठेवींव्दारे उभारलेल्या निधीचा अपहार करण्याचे गैर हेतुने कोणत्याही कर्ज प्रकरणात संपुर्ण आवश्यक कागदपत्राची पुर्तता न करता कोणतीही मालमत्ता कर्जापोटी तारण न घेता जाणीवपुर्वक अपुर्ण मालमत्ता कर्ज रकमेपोटी स्वीकारुन सदर मालमत्ताच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा न चढविता परस्पर कर्ज वाटप केल्या प्रकार घडला हाेता.

nandurbar
Cold Wave : थंडीमुळे जनावरांना 'या' राेगाची लागण, शेतकरी धास्तावले; राज्यभरातील दूध उत्पादनावर परिणाम

तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे आर्थिक लाभासाठी व बँकेचे ठेवीदारांचा पैसा हडप करण्याचे उद्येशाने नियम बाहयरित्या त्याचेच नातेवाईकांचे हितसंबधितांच्या तसेच एकाच कुटूंबातील अनेक सदस्यांना बेकायदेशीर कर्ज मंजुर करुन त्या कर्जापोटी कोणतेही तारण न स्विकारता परस्पर कर्ज दिल आहे.

nandurbar
Indurikar Maharaj Mother In Law : थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे पाटलांचे डावपेच; सरपंच शशिकला पवार भाजपात

सुमारे साडे तीन काेटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com