ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख यांच्यासह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल, भावना गवळींनी केलेली तक्रार

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Akola News
Akola NewsSaam TV

>> जयेश गावंडे

अकोला : शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख यांच्यासह काही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola News
CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून जाणून घेतलं भविष्य? दौरा गोपनीय ठेवण्याचा होता प्रयत्न

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे काल अकोल्यात आले होते. दरम्यान विनायक राऊत यांना रेल्वे स्थानकावर निरोप देण्यासाठी आलेल्या आमदार नितीन देशमुख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. याच दरम्यान शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या अकोला रेल्वे स्थानकावर दिसताच त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. (Latest Marathi News)

Akola News
'राज्यपालांनी पदाची अब्रू घालवली';राजू शेट्टींनी राष्ट्रपतींना पत्र लिहत केली कोश्यारी यांना हटविण्याची मागणी

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी याची तक्रार अकोला रेल्वे पोलीस स्टेशनला दिली होती. दरम्यान आज याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतरांवर कलम 294, 143 आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

काल अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केली आहे. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली. घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या देखील मारल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com