विहीरीत पडलेल्या मांजरीनं वाघाची जिरवली; पहा Video

विहीरीत पडलेल्या या बिबट्याला ७ तासांनी बाहेर काढण्यात आले.
विहीरीत पडलेल्या मांजरीनं वाघाची जिरवली; पहा Video
विहीरीत पडलेल्या मांजरीनं वाघाची जिरवली; पहा VideoSaam Tv

नाशिक - अलीकडे मानवी वस्तीजवळ बिबट्याचा Leopard वावर वाढला आहे. त्यामुळे अशा अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्यासह मांजर देखील विहिरीत पडल्याचा प्रकार सिन्नरमध्ये घडला. सिन्नर Sinnar तालुक्यातील कनकोरी गावातील शेतकरी गणेश सांगळे यांच्या मालकीच्या विहिरीत रात्रीच्या वेळेस भक्ष्याच्या शोधात मांजराचा पाठलाग करतांना विहिरीचा अंदाज न आल्यामुळे बिबट्या आणि मांजर विहिरीत पडले. रात्रभर या विहिरीत बिबट्या आणि मांजराचा मुक्काम राहिला.

मात्र सकाळ होताच रात्रभर पाण्यामध्ये मुक्कामाला असणाऱ्या बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी गणेश सांगळे यांच्या विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीच्या मधोमध असणाऱ्या कपारीवर बिबट्या दिसून आला तर दुसऱ्या बाजूला काठावर मांजर बसलेली दिसून येत आहे.

विहीरीत पडलेल्या मांजरीनं वाघाची जिरवली; पहा Video
Video: तब्बल 9 तासापेक्षा जास्त वेळ केलं Plank; गिनीज बुकमध्ये नोंद

विशेष म्हणजे मांजर कुळातील हे दोन्ही प्राणी एकमेकांसमोर येऊन एकमेकांवर गुरगुरलेही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दरम्यान, विहीरीत पडलेल्या या बिबट्याला ७ तासांनी बाहेर काढण्यात आले. वन विभागाने या बिबट्याला विहीरीतून बाहेर काढून अभयआरण्यात सोडण्यात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com