
Akola Railway Accident News: अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात झाला. चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असताना पाय घसरून पिता-पुत्र खाली गेले. मात्र रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचाही जीव वाचला आहे. अपघाताचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अकोला रेल्वेस्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरल्यानंतर गाडी सुरु घाईत धावत्या गाडीत चढताना ही घटना घडली. ओडिशा राज्यातील कटक येथील हे रहिवाशी आहेत. 16 मे रोजी ही घटना घडली आहे.
भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस या गाडीत कटक ते मनमाड असा प्रवास करत असलेल्या साहू कुटुंबीयांपैकी वडील सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू पाणी पिण्यासाठी फलाटावर उतरले. पाण्याच्या बाटल्या भरेपर्यंत गाडी फलाटावरून पुढे रवाना झाली.
गाडी सुटल्याचे पाहून सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू दोघे पळत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले व चढण्याचा प्रयत्न करू लागले. हात ओले असल्यामुळे वडील व मुलगा धावत्या गाडीतून फलाटावर पडले. (Latest Marathi News)
यावेळी फलाटावर कर्तव्यावर असलेले आरपीएफ पोलीस निरीक्षक युनूस खान यांनी हा प्रकार पाहिला. उपनिरीक्षक एस. एम शाह यांनी धाव घेत शरदचंद्र साहू याला पडण्यापासून वाचवले तर तोपर्यंत वडील सौरभ साहू रेल्वे रुळ व फलाटामधील जागेत पडले. हे दृष्य पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. (Breaking Marathi News)
परंतु, निरीक्षक युनूस खान यांनी सौरभ साहू यांना धीर देत फलाटाच्या भिंतीला चिकटून राहण्यास सांगितले. साहू यांनीही त्यांचे म्हणणे ऐकले. तोपर्यंत चालकाला संदेश गेल्यामुळे गाडी थांबवण्यात आली. युनूस खान यांनी तातडीने धाव घेत सौरभ साहू यांना बाहेर काढले. आरपीएफ अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.