शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहून गणेशोत्सव साजरा करा : टोपे

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहून गणेशोत्सव साजरा करा : टोपे
शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहून गणेशोत्सव साजरा करा : टोपेSaam Tv

जालना : शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. यावर्षी गणेश मंडळांनी संख्या न वाढवता जुन्याच गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करावी असं आवाहन देखील टोपे यांनी केले.

हे देखील पहा -

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात जे मराठा बांधव शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना आधीच्या सरकारने दिलेले आश्वासन महाविकास आघाडी सरकार पाळेल, त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं टोपे म्हणाले. जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या ४२ बांधवांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याच्या मागणीसाठी अंबडमध्ये आंदोलन केले होते.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमात राहून गणेशोत्सव साजरा करा : टोपे
Reservation : इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपचार घेणार नसल्याच सांगत या आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला. अखेर टोपे यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com