हा तर आमच्यासाठी सणच; राणेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरुच

हा तर आमच्यासाठी सणच; राणेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरुच
celebration of narayan rane supporters

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र माेदी prime minister narendra modi यांनी बुधवारी (ता. सात) केंद्रिय मंत्रिमंडळाचा पहिलावहिला विस्तार extended central ministry केला. तब्बल 43 मंत्र्यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे Narayan Rane यांच्यासमवेत कपिल पाटील, डाॅ. भागवत कराड, डाॅ. भारती पवार यांचा समावेश झाला आहे. नारायण राणे यांची वर्णी लागताच काेकणात बुधवारपासूनच ठिकठिकाणी उत्साहाचे वातावरण आहे. आज (गुरुवार) काेकणात अनेक ठिकाणी जल्लाेष सुरु आहे. (celebration-of-narayan-rane- supporters-in-kokan)

खासदार नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाल्याने सिंधुदुर्ग येथे माेठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारपासून आनंदित असलेल्या येथील जनतेने आजही जल्लाेष करीत राणेंच्या नावाने अखंड जयघाेष सुरु ठेवला आहे.

celebration of narayan rane supporters
काेकणवासियांनाे! दक्षिण मांड नदीवरील पूल वाहतुकीस झाला खुला

कणकवली नाक्यावर पुन्हा सकाळी राणेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. फटाके वाजवून नागरिकांना पेढे वाटण्यात आले. नारायण राणेंच्या अभिनंदनाचा फलक लावण्यात आले आहेत. याबराेबरच पादचाऱ्यांना जिलेबीचेही वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणेंना मंत्रिपद हा एक सण असून याचा जल्लोष आणखी काही दिवस असाच सुरू राहणार असल्याचे कार्यकर्त्यांसमवेत कणकवलीचे भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी नमूद केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com