'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे मागे घेतल्याने शेतकरी विजय दिवस संगमनेरच्या तळेगाव येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरात
'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरातगोविंद साळुंके

अहमदनगर : केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करण्याचे काम करत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे मागे घेतल्याने शेतकरी विजय दिवस संगमनेरच्या तळेगाव येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला या वेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.

आमदार सुधीर तांबे सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे थोरात म्हणाले आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. आता अगोदर टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे देखील पहा :

यावेळी बोलताना थोरात यांनी कंगना राणावतवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आता एक नवीन नटी आली आहे, तिची स्वातंत्र्याबद्दल बोलण्याची लायकी आहे का? कंगणाचे बोलणे चुकीचे असून ती वादग्रस्त बोलते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारोंचे बळी गेले आहेत. ही बोलते आणि तिला संरक्षण मिळते आणि लगेच पद्मश्री मिळतो.

आज ती स्वातंत्र्यावर बोललीय उद्या राज्यघटनेवर बोलले जे असे वादग्रस्त बोलतात त्यांना लगेच पद्मश्री मिळतो. अश्याच प्रकारचे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे. आता त्यांनाही पद्मश्री मिळेल, अशी टिपण्णी यावेळी थोरात यांनी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर केली आहे.

मात्र, अशाप्रकारचे बोलणे सहज नसते, कोणीतरी यामागे असते. हे आता राज्यघटनेकडे देखील वळतील आणि राज्य घटना बोगस आहे म्हणतील. देश राज्य घटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्ष्यात ठेवले पाहिजे. सर्व संत विचाराचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन राज्यघटना तयार केली आहे असं ही थोरात म्हणाले.

'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरात
SwachhSurvekshan2021 : लातूर मनपास जीएफसी फाईव्ह स्टार मानांकन!
'केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करत आहे' - बाळासाहेब थोरात
बनावट कागदपत्रे दाखवून ठाणे महापालिकेच्या सदनिकांमध्ये घुसखोरी! कारवाईची मागणी

शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्याविषयी बोलताना थोरात म्हणाले, केंद्र सरकारने या शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रक्त गोठवणार्‍या थंडीत शेतकर्‍यांवर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडविले गेले.

काही शेतकरी बांधवांना गाडीखाली चिरडून मारले गेले, त्याची जबाबदारी मोदी सरकारला टाळता येणार नाही आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल. शेतकर्‍यांनी निर्धाराने लढा देऊन कितीही मोठ्या अहंकारी शासनाला झुकवू शकतो, हे दाखवून दिले. शेतकरी एकजुटीचा हा विजय आहे. परंतु शेतकर्‍याला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल असेही थोरात म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com