'बाळासाहेबांनी जे कमावलं ते काहींना टिकवता आलं नाही', नारायण राणेंचा टोला

'बाळासाहेबांनी जे कमावलं ते काहींना टिकवता आलं नाही', नारायण राणेंचा टोला
narayan rane & uddhav thackeraysaam tv

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maharashtra government) स्थापन झाल्यापासून केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकार संघर्ष सुरु झाला. विरोधीपक्ष भाजपने सत्ता स्थापन केलेल्या आघाडीत बिघाडी करण्यासाठी एकही संधी सोडली नाही. त्यातच नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर टीकेची झोडच उठवली. त्यामुळे नारायण राणे (Narayan rane) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात होणाऱ्या शाब्दीक चकमकी सूरूच आहेत. राणे यांनी माध्यमांशी संवाद साधून पुन्हा एकदा शिवसेनेवर तोफ डागली आहे. राणे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या गुणांचे मुल्यमापन कुणी करू नये. ते कर्तृत्ववान होते त्यांनी शिवसेना पुढे नेली. बाळासाहेबांना माणूसकी होती. कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं. पण जे बाळासाहेबांनी कमावलं ते काहींना टिकवता आलं नाही. त्यांना साहेबांचं मूल्यमापन करण्याची नैतिकता नाही.

narayan rane & uddhav thackeray
डोंबिवली मधील मानपाडा पोलिसांनी घेतला तर्रीदार मिसळीचा आस्वाद

दरम्यान राणे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलंय. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र दिनी लोकांना देण्यासारखं बोला, गरिबी, दरडोई उत्पन्न यावर बोला, असं राणे आवाहन राणे यांनी ठाकरे यांना केलं असून ते पुढे म्हणाले, जे जमेल ते करावं, राजकारण जमत नाही, मुख्यमंत्री पदावर शोभतही नाही आणि जमतही नाही. महाराष्ट्राने जी प्रगती केली, त्यातील 34% वाटा हा मुंबईचा आहे. राज्यातील नागरिकांनी उद्योगाच्या माध्यमातून प्रगती करावी. तसंच भोंग्यांच्या मुद्द्यावरही राणे यांनी म्हटलं, मुख्यमंत्र्यांना सांगा भोंगे काढायचं धोरण केंद्राने का ठरवावे ? तुम्हाला राजकारण जमत नाही. काहीतरी कर्तृत्व करुन दाखवा. असंही म्हणत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

राणे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पुढे म्हणाले, बाबरी मस्जिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते ? एक टक्का तरी उद्धव ठाकरे यांचे योगदान आहे का, एक कानफटात मारुन एक दिवस तरी जेलमध्ये गेले आहेत का ? आयत्या बिळावर नागोबा आहेत फक्त. शरद पवारांच्या आशीर्वादाने चाललंय फक्त. मंत्रालयात न येता 5 वर्ष कसे पूर्ण करणार ? काही मुलींच्या हत्या करून आत्महत्या केल्याचं जाहीर करतात. तुमच्या डोळ्याला कोणी विचारात नाही, हुंगत बसा, मुख्यमंत्री म्हणून तुमचा महाराष्ट्राला काही फायदा नाही.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.