केंद्राचे नवे शेती धोरण शेतकरी फायद्याचेच- प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे

किसान संवाद यात्रेच्या निमित्ताने श्री. काळे शुक्रवारी (ता. नऊ) नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वसंतनगर येथे खासदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला.
केंद्राचे नवे शेती धोरण शेतकरी फायद्याचेच- प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे
किसान संवाद यात्रेत श्री. काळे

प्रमोद चौधरी

नांदेड ः देशातील सर्व घटकांतील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी मोदी सरकारने नवीन शेती धोरण जाहीर केले. हे धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. विरोधी पक्ष या धोरणाविषयी संभ्रम निर्माण करत असल्याने शेतकरी चिंतेत आहे, असे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी व्यक्त केले.

किसान संवाद यात्रेच्या निमित्ताने श्री. काळे शुक्रवारी (ता. नऊ) नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वसंतनगर येथे खासदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, काॅंग्रेसशासीत राज्याकर्त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. परिणामी शेतकऱ्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होता. आज आपल्याला परदेशातून अन्नधान्य मागवावे लागत असल्याची खंतही श्री. काळे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पावसाचे कमबॅक..तीन आठवड्यानंतर जळगावात हजेरी

देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने २०२०-२१ मध्ये एक लाख २३ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली. तसेच माती परीक्षण योजनेतून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करुन जैविक खताकडे ते वळले आहेत. कमीत कमी पाण्यामध्ये शेतकी करता यावी म्हणून सूक्ष्म सिंचन प्रकल्प योजनाही मोदी सरकारने आणली. त्याचा असंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे, हे मी सांगण्याची गरज नसल्याचेही श्री. काळे यांनी स्पष्ट केले आहे.

पूर्वीपासूनच सुरु असलेली पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये मोदी सरकारने सुधारणा केली आहे. याची प्रभावी अमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याची आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी विरोधी निकष लावून विमा कंपन्यांचे गल्ले भरण्याचे काम केले आहे. परिणामी ७० ते ७५ टक्के शेतकरी हे पिकविम्यापासून वंचित राहिले आहे. जिल्ह्यात केळी आणि उस हे मुख्य पीक आहे. त्यामुळे राजकारण न करता केळी तसेच उस उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे, साखर कारखाने टिकले पाहिजेत यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचेही श्री. काळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खासदार प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर भोयर, मकरंद कोरडे, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले, बाबुराव केंद्रे, रंगनाथ सोळुंके आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com