सीईओ वर्षा ठाकूर यांची तामसा पीएचसीला भेट; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे केले कौतूक

येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाढ यांनी कार्यभार स्विकारल्यापासून पीएचसीमध्ये राबविलेल्या विविध आरोग्य विषयक व पूरक उपक्रमांची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर वर्षा ठाकूर यांनी डॉ. बोंदरवाड यांना प्रोत्साहनपर सत्कार करुन सन्मानित केले.
सीईओ वर्षा ठाकूर यांची तामसा पीएचसीला भेट; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे केले कौतूक
सीईओ वर्षा ठाकूर नांदेड

तामसा ( जिल्हा नांदेड ) : प्रामाणिकपणे कर्तव्यपालन करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्याची प्रत्यक्षात प्रचिती आल्यानंतर कार्यकौतुक करण्याचे समाधान मोठे असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी (ता. आठ) तामसा येथील पीएचसीला अचानक भेट दिल्यानंतर केले.

येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाढ यांनी कार्यभार स्विकारल्यापासून पीएचसीमध्ये राबविलेल्या विविध आरोग्य विषयक व पूरक उपक्रमांची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर वर्षा ठाकूर यांनी डॉ. बोंदरवाड यांना प्रोत्साहनपर सत्कार करुन सन्मानित केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम, ग्रामविकास अधिकारी आनंद शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन संगपवाड, डॉ. सुनिता राठोड, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

पीएचसीच्या परिसरात वर्षा ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पीएचसीमधील स्वच्छता, पेडियाट्रिक कोविड सेंटर, बाळंतकक्ष, लसीकरण केंद्र, औषधीविभाग, कार्यालय आदींची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याची माहिती ऐकल्यानंतर येथे प्रत्यक्ष भेट देण्याचे ठरवून आवर्जून आले व ऐकलेले प्रत्यक्षात अनुभवल्यामुळे समाधान वाटले.

पीएचसी परिसरात मियावाकी घनवन विकसित करणे, औषधीविभागाबाबतच्या सूचना श्रीमती ठाकूर यांनी करुन गटविकास अधिकारी गड्डापोड यांना यासाठी सहकार्य करण्याचे निर्देशित केले. डॉ. बोंदरवाड यांनी सीईओ वर्षा ठाकूर व डॉ. बालाजी शिंदे यांची आरोग्यदेवता धन्वंतरी यांची प्रतिमा भेट देऊन पीएचसी तर्फे स्वागत केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कदम यांचा योग्य मार्गदर्शनाबद्दल यावेळी वरिष्ठांनी सन्मान केला.डॉ. बोंदरवाड व त्यांच्या टीमचे कार्य कौतुकास्पद व इतर पीएचसीना मार्गदर्शक ठरणारे आहे, असे गौरवोद्गार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी काढले. सूत्रसंचालन आरोग्य कर्मचारी सुभाष राठोड यांनी केले. डॉ. बोंदरवाड यांनी आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com