अकाेट : संचारबंदी आणखी २ दिवस वाढली; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोणतीही अपरिचित घटना घडल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा असे पोलिसांनी केले आहे.
अकाेट : संचारबंदी आणखी २ दिवस वाढली; पोलिसांचा तगडा बंदोबस्त
chandrakishor meena visits akot city

अकाेला : अमरावतीच्या हिंसक घटनेनंतर अकोल्यातील अकोट शहरातील हनुमान नगर, नवगाजी प्लॉट येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून अकोल्यातील अकोट येथे एका दिवसाची संचारबंदी प्रशासनाने जाहीर केली होती. आता परिस्थिती पाहता प्रशासनाने ही संचारबंदी १७ नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे.

chandrakishor meena visits akot city
दातृत्व; रिक्षाचालकास महिलेने दिली एक कोटी रुपयांची संपत्ती

आज (साेमवार) अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना chandrakishor meena visits akot city यांनी अकोट शहराची पाहणी केली. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अकोटात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान दगडफेकी प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवत असून सोशल मीडियावर चुकीची माहिती फारवर्ड करणाऱ्यांकडे पोलिस ठाण्याचे बारीक लक्ष आहे.

कोणीही अफवा पसरवू नये. सध्या स्थितीत वातावरण शांत असून नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. कोणतीही अपरिचित घटना घडल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा असे पोलिसांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com