11th admission : CET नोंदणीकरिता संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी

नोंदणीकरिता संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी
11th admission : CET नोंदणीकरिता संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी
11th admission : CET नोंदणीकरिता संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी Saam Tv

नागपूर : ११ वीच्या प्रवेशाकरिता सीईटी CET परीक्षेची Exam नोंदणी मंगळवारपासून सुरू करण्यात आली होती. मात्र, पहिल्या दिवशीच नोंदणी करताना विद्यार्थ्यांन अडचणीचा Difficulties सामना करावा लागला आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक टाकल्यावर त्याठिकाणी येणारी गुणपत्रिका आणि मेन गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याचे उघडकीस आले आहे.

यामुळे राज्य शिक्षण मंडळावर आता संकेतस्थळालाच दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियाकरिता सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येणार आहे. परंतु, ती केवळ विद्यार्थ्यांकरिता पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा राहणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यायची असेल, तर ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकणार आहेत.

हे देखील पहा-

परीक्षेला बसण्याकरिता कुणावरही सक्ती केली जाणार नाही. सीईटी परीक्षा ही २१ ऑगस्टला घेतली जाणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या निकालावेळेस संकेतस्थळावर प्रचंड तांत्रिक अडचणी निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अनेक अडचणी पार करावे लागले आहे. यानंतर निकाल मिळाले आहे.

आता इयत्ता ११ वी प्रवेशाकरिता पहिल्याच दिवशी संकेतस्थळामध्ये अनेक तांत्रिक अडथळेना सामना विद्यार्थ्यांना करावा लागला आहे. मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला बैठक क्रमांकाची नोंद करायची आहे. यानंतर त्याची माहिती त्याठिकाणी येणार असून, त्याला परीक्षा द्यायची की नाही या दोन्ही पैकी एक पर्याय निवडायचा आहे.

11th admission : CET नोंदणीकरिता संकेतस्थळामध्ये तांत्रिक अडचणी
विद्यार्थ्यांनो, अकरावी प्रवेशासाठी सुरू होणार CET रजिस्ट्रेशन? या पध्दतीने करा नोंदणी...

मात्र, संकेतस्थळावर अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता त्यांची मुळ गुणपत्रिका आणि संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या गुणपत्रिका यामध्ये फरक असल्याचे आढळून आले आहे, तर काही विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचा प्रयत्न केले असता संकेतस्थळामध्ये अनेकदा "एरर" येत असल्यामुळे अर्जच करता आलेला नाही. यामुळे पहिल्याच दिवशी बहुतांश विद्यार्थ्यांना या गोष्टींचा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

सीईटीच्या संकेतस्थळामध्ये काही चुका दिसून आल्याच्या तक्रारी वाढल्यावर यामधील तांत्रिक चुका दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळामधील सूत्रांनी यावेळी दिली आहे. यामुळे संकेतस्थळाची योग्य तपासणी न करता मंडळाने अर्ज नोंदणीला सुरुवात कुठल्या आधारावर करायचे असा सवाल आता करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com