चैन स्नॅचिंग करणारी 'बंटी-बबली' ची जोडी अखेर जेरबंद

अकोल्यात वेगवेगळ्या परिसरात चैन स्नॅचिंग करून लुटणारी 'बंटी- बबली' ची जोडी अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
चैन स्नॅचिंग करणारी 'बंटी-बबली' ची जोडी अखेर जेरबंद
चैन स्नॅचिंग करणारी 'बंटी-बबली' ची जोडी अखेर जेरबंदजयेश गावंडे

अकोला: अकोल्यात वेगवेगळ्या परिसरात चैन स्नॅचिंग करून लुटणारी 'बंटी- बबली' ची जोडी अखेर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. प्रकाश लोंढे, शोभा कोरडे असं अटक करण्यात आलेल्या 'बंटी-बबली' आरोपींची नावे आहेत. (Chain snatching 'Bunty-Bubbly' duo finally arrested)

हे देखील पहा -

अकोल्यातील डाबकी रोड पोलीस स्टेशनला फिर्यादी शोभा वानखडे यांनी तक्रार दिली की, त्या मॉर्निंग वॉक करीत असतांना अनोळखी आरोपी यांनी मोटरसायकलने येवुन त्यांचे गळयातील सोन्याची चैन जबरीने तोडुन पळुन गेले, अशा दिलेल्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे अनोळखी आरोपी विरुद्ध कलम ३९२,३४ भादवी अन्वये नोंद करून तपासावर घेण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे आरोपी प्रकाश भानुदास लोंढे वय ३० रा.खडकी अकोला व शोभा अशोक कोरडे वय ३४ वर्ष रा.गजानन नगर चांदुर यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता या आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

चैन स्नॅचिंग करणारी 'बंटी-बबली' ची जोडी अखेर जेरबंद
राज्य आणि मुंबई सुरक्षित, दिल्लीला पथक रवाना होणार - ATS प्रमुख विनीत अग्रवाल

तसेच त्यांना विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता अकोल्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपीकडून एकुण 1,09,000 /रू. चा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक मॅडम, श्रीमती मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. संतोष महल्ले, सपोनि.नितीन चव्हाण पथकाने केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com