''केतकी चितळेचे वक्तव्य ही विकृती, गृह विभागाने कारवाई करावी''

''राज्य महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, प्रसिद्धीसाठी असे वादग्रस्त वक्तव्य केले जातात''
''केतकी चितळेचे वक्तव्य ही विकृती, गृह विभागाने कारवाई करावी''
Rupali Chakankar SaamTvNews

नागपूर: केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर (Ketaki Chitale Post) राष्ट्रवादी काँग्रेसकडून अटकेची मागणी केली जात आहे. आता यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तिमत्वाने देशात जे संकट आले त्यावेळी दोन पाऊले पुढं करून मदतीची भूमिका राहिली त्या व्यक्तीबद्दल अशा पद्धतीने विधान होत आहे, ही विकृती आहे, ही विकृती वाढत चालली आहे, आमची मागणी आहे की गृह विभागाने कारवाई करावी असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

Rupali Chakankar
आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावरून छगन भुजबळांची नाराजी, म्हणाले...

राज्य महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, प्रसिद्धीसाठी असे वादग्रस्त वक्तव्य केले जातात, अशा विकृतीवर कारवाई झाली पाहिजे. समाजातून विरोध होत आहे, हे जाणीवपूर्वक होत आहे. गृह विभागाने कारवाई करावी, सायबर विभागाने असे अकाउंट बंद करावेत अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की केतकी चितळेवर कुठल्या प्रकारचे कलम लावले माहीत नाही, मात्र समाजाची अशी मागणी आहे की अशी विकृती जायबंदी केली पाहिजे.

राणा दाम्पत्यानी कोरोना काळात केंद्र सरकारनं आणि त्यांनी स्वतः काय केलं हे सांगावं, महाराष्ट्राचे काही प्रश्न आहेत, त्यावर त्यांनी बोलावे, ही विकृत मनोवृत्ती आहे. विरोधक त्यांच्याकडून हे करून हेत आहे, विरोधकांनी राज्यातील प्रश्नांवर बोलावं असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. दरम्यान केतकी चितळेवर कळवा, पुणे याठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने केतकी चितळेला त्वरित अटक करा अशी मागणी होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.