नंदुरबार, वाशिममध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

नंदुरबारात आणि वाशिममध्ये भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
नंदुरबार, वाशिममध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन
नंदुरबार, वाशिममध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलनदिनू गावित/गजानन भोयर

दिनू गावित/गजानन भोयर

नंदुरबार : राज्यातील महा विकास आघाडी सरकारच्या Mahavikas Aghadi Government अक्षम्य दुर्लक्षामुळेच ओबीसी OBC आरक्षण रद्द झाल्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा व नंदुरबार शहरातील धुळे चौफुली वर भारतीय जनता BJP पार्टीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. Chakkajam agitation in Nandurbar and Washim demanding OBC reservation

आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 'ऊठ ओबीसी जागा हो' एकजुटीचा दादा हो; ओबीसी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे; मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे; आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे; अशा घोषणा देत शहरातील धुळे चौफुली वर महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा-

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तळोदा-शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी Rajesh Padvi, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी Vijay Chaudhari, महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित रहावे; अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनकर्त्यां कडून करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने याची दखल न घेतल्यास सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस Police प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला होता.

नंदुरबार, वाशिममध्ये ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन
केंद्र सरकारच्या 'कोविड इनोव्हेशन' पुरस्कारांत केडीएमसी अव्वल !

ओबोसी चे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपच्या वतीनं वाशिम मध्ये चक्काजाम आंदोलन :

वाशिम : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे राजकीय आरक्षण गेले आहे. ओबीसी आरक्षण त्वरित मिळावं यासाठी वाशिम शहरातील पुसद नाका चौकात नांदेड-अकोला महार्गावर वाशिम चे आमदार लखन मलिक यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाजातील घटक असलेले बारा बलुतेदार मधील अनेक समाज या आंदोलनात सहभागी झाले होते. जवळपास एक तास चाललेल्या या चक्का जाममुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com