Belgaum News : संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

बेळगाव महापालिकांच्या निवडणूकीत भाजपाने 35 काँग्रेसला 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समितीला 4 आणि एमआयएम चा १ असे उमेदवार विजयी झाले.
Belgaum News : संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला
Belgaum News : संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला Saam Tv

बेळगावमध्ये भाजप जिंकलीच नाहीतर मराठी भाषिक नगरसेवक विजयी झाले, ही आनंदाची बाब आहे. आता महापौर कोण करायचा? हा कर्नाटक भाजपचा निर्णय आहे, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव महापालिका निवडणूकांच्या निकालावर आपला आनंद व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर, यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणाही साधला आहे.

हे देखील पहा-

बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालावर संजय राऊत यांची आलेली प्रतिक्रिया अपेक्षितच होती. भाजपच्या विजयी नगरसेवकांपैकी निम्मे मराठी आहेत, मग बेळगावमध्ये मराठी भाषिक हरला कसा? असा सवाल विचारत त्यांनी संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, सकाळी काय बोलले हे संध्याकाळी त्यांना आठवत नाही, असा सणसणीत टोलाही लगावला आहे.

Belgaum News : संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला
त्‍या महिलेची हत्‍या प्रेमसंबंधातून..शंभराहून अधिक फुटेज तपासत धागे उलगडले

दरम्यान, बेळगाव महापालिकांच्या निवडणूकीत भाजपाने 35 काँग्रेसला 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समितीला 4 आणि एमआयएम चा १ असे उमेदवार विजयी झाले. बेळगावच्या जनतेने भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा झाला.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com