अजित पवार यांना केवळ पैसा कळतो : चंद्रकांत पाटील

"अजित पवारांना फक्त पैसा कळतो" अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
अजित पवार यांना केवळ पैसा कळतो : चंद्रकांत पाटील
अजित पवार यांना केवळ पैसा कळतो : चंद्रकांत पाटीलजयेश गावंडे

अकोला : संजय राऊतांनी माझ्यावर लक्ष देण्याची गरज नाही, कारण संजय राऊत यांना भरपूर कामे आहेत, त्यांना अमेरिकेची निवडणूक लढवायची आहे. असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला ते अकोल्यात माध्यमांसोबत बोलत होते. दरम्यान, त्यांना ईडी संदर्भात विचारले असता, भाजपही ईडीला मार्गदर्शन करत नाही, आणि मी सुद्धा ईडीचा अधिकारी नाही असे ते म्हणाले.

हे देखील पहा -

मंदिर उघडण्यासंदर्भात बोलताना पाटील यांनी अजित पवारांवर पलटवार करत, अजित पवार यांनी सामान्य भविकांशी चर्चा करावी, आणि त्याच्यात काय घालमेल सुरू आहे ते पाहावं. अजित पवारांना फक्त पैसा कळतो. अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अनिल परब यांचे वरील नवीन घोटाळे भाजपने काढण्याआधी, जुनेच घोटाळे निकाली लागू ध्या. संदर्भात मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना, हे सरकार कसं सुरू आहे? असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

अजित पवार यांना केवळ पैसा कळतो : चंद्रकांत पाटील
मनोहर मामाचा उंदर गावातील आश्रम बेकायदेशीर

निवडणूक लढण्यासंदर्भात आम्हाला आता कार्यकर्त्यांना द्विधा मनस्तिथीत ठेवायचे नाही. निवडणूक लढवायची की नाही लढवायची, आता निवडणूक लढायची आणि एकट्याच्या भरवश्यावर लढायची अस मत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार येणार अस हे सरकार म्हणत आहे. पहिला पेशंट सापडून दीड वर्ष झालं, दोन व्हाक्सीन नंतर कोरोनाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे लोकांना किती दिवस घरात कोंडून ठेवणार, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com