भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक, ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक झाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज निधन झाले आहे.
saraswati bacchu patil
saraswati bacchu patilsaam tv

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मातृशोक झाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज, रविवारी निधन झालं आहे. सरस्वती बच्चू पाटील यांचं कोल्हापूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. त्यांनी ९१ वर्षी अखेरचा श्वास घेतला.याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा , सून , २ मुली असा परिवार आहे. ( Kolhapur News In Marathi )

saraswati bacchu patil
'मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना भावनिक आवाहन

चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईने त्यांच्या मुलांवर स्वाभिमानाचे आणि मेहनतीचे संस्कार केले. त्यांच्या संस्काराच्या शिदोरीवर पाटील हे जीवनात वाटचाल करीत आहेत. पाटील यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पाटील यांच्या मातोश्रीच्या पार्थिवावर आज दिनांक (२४ जुलै) रोजी रात्री ८.३० वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'माझी आई सरस्वती (वय ९१) आज देवाघरी गेली. वृद्धापकाळामुळे प्रकृती खाली-वर होत होतीच. प्रतिकूल परिस्थितीतही संसार करताना आईने आम्हा भावंडांवर स्वाभिमान आणि मेहनतीनं जगायचे संस्कार केले. या शिदोरीवरच माझी आयुष्यभर वाटचाल झाली आहे.आई, देवाघरूनही तुझं आमच्यावर लक्ष असेलच..ओम शांती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संदेशात म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com