एका महिलेवर १५ वर्ष अन्याय करणारा मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? चंद्रकांत पाटलांचा सवाल
एका महिलेवर १५ वर्ष अन्याय करणारा मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? चंद्रकांत पाटलांचा सवालSaam Tv

एका महिलेवर १५ वर्ष अन्याय करणारा मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? चंद्रकांत पाटलांचा सवाल

धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी शपथ पत्र दिले होते, त्यात दोन बायकांचा उल्लेख केला होता का?

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या Maharashtra संस्कृतीमध्ये असे हे पहिल्यांदाच घडत आहे. एका महिलेसोबत पंधरा वर्ष अन्याय करणारा व्यक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrkant Patil यांनी केला आहे. शिवाय महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या शिवसेना नेत्या नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे Supriya Sule या आवाज का उठवत नाहीत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे देखील पहा -

करुणा मुंडे या उद्या परळीमध्ये दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडणार आहेत. यासंदर्भात त्यांनी काल फेसबुक लाईव्हवरून धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात करीत पुराव्यासकट बोलणार असल्याचे सांगितले होते. त्यावर आज चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये एका महिलेवर १५ वर्ष अन्याय करणारा व्यक्ती मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो?

एका महिलेवर १५ वर्ष अन्याय करणारा मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? चंद्रकांत पाटलांचा सवाल
धक्कादायक! हनीट्रॅपमधून चक्क दिल्लीच्या डॉक्टरवरच मारला डल्ला (पहा व्हिडिओ)

धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी निवडणूक लढवण्यासाठी शपथ पत्र दिले होते, त्यात दोन बायकांचा उल्लेख केला होता का? आता तेही समोर आले पाहिजे'. धनंजय मुंडे यांच्यावर तक्रार केल्यानंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र राज्यात गेंड्याची कातडी असलेले सरकार असल्याने धनंजय मुंडेचा राजीनामा काय उपयोग असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com