'संजय राऊत कोथळा काढण्याची भाषा करतात, त्यासाठी हिंमत लागते'

सध्या जी काही भाषा सुरू आहे ते आम्ही सर्व लक्षात ठेवू
'संजय राऊत कोथळा काढण्याची भाषा करतात, त्यासाठी हिंमत लागते'
'संजय राऊत कोथळा काढण्याची भाषा करतात, त्यासाठी हिंमत लागते'Saam Tv

औरंगाबाद - शिवसेनेने Shivsena पाठीत खंजीर खुपसला असे मी म्हटल्यानंतर शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागले. तुम्ही नारायण राणे Narayan Rane यांनी केवळ थोबाडीत मारली असती असे वाक्य बोलल्यावर अटक करता. तिकडे संजय राऊत Sanjay Raut कोथळा काढण्याची भाषा करतात. त्यांना अटक केली पाहिजे. संजय राऊत जर घोटाळा काढण्याची भाषा करत असतील तर त्यासाठी हिंमत लागते. पण आम्ही कुणाला टोकणार नाही, आमच्यावर आले तर आम्ही कमी नाही', असे प्रतिआव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrkant Patil यांनी शिवसेनेला दिले आहे.

हे देखील पहा -

औरंगाबादमध्ये भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला.'सध्या जी काही भाषा सुरू आहे ते आम्ही सर्व लक्षात ठेवू आम्ही कुणालाही तो होणार नाही आणि कोणी आले तर सोडणार नाही, हम करे सो कायदा राज्यात सुरू आहे. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

'संजय राऊत कोथळा काढण्याची भाषा करतात, त्यासाठी हिंमत लागते'
एका महिलेवर १५ वर्ष अन्याय करणारा मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? चंद्रकांत पाटलांचा सवाल

तिसरी लाट येणारच नाही, असं भाकीत करण्यासाठी मी उद्धवजींसारखा डॉक्टर किंवा कंपाउंडर नाही. मी उद्धवजींसारखा डॉक्टर नाही संजय राऊत यांच्या सारखा कंपाउंडर नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ पण शकते कारण कोविड फक्त उद्धवजींशी बोलतो आणि तो सांगतो की आता लाट कमी झाली आहे आता लाट वाढणार आहे माझ्याशी काही बोलत नाही अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com