वेळ पडल्यास शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन निवडणूक लढवू; चंद्रकांत पाटलांचा इशारा

'अनेक सभामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील अस सांगितलं होतं त्यावेळी शिवसेनेनं का विरोध केला नाही.'
वेळ पडल्यास शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन निवडणूक लढवू; चंद्रकांत पाटलांचा इशारा
वेळ पडल्यास शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन निवडणूक लढवू; चंद्रकांत पाटलांचा इशाराSaam TV

कोल्हापूर : आज कोल्हापूरमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) य़ांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत (Kolhapur District Central Co-operative Bank) भाजपाने 9 जागांसाठी अर्ज भरले आहेत. मात्र अशा निवडणुका बिनविरोध करणं चांगलं असतं तसंच या निवडणूकीमध्ये भाजपाला 2 जागा दिल्याशिवाय भाजप माघार घेणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (chandrakant patil statement about Elections in kolhapur)

हे देखील पहा -

वेळ पडल्यास शिवसेनेमध्ये नाराज असलेल्यांना घेऊन जुळवाजुळव करू आणि निवडणूक लढवू असा इशाराच पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान त्यांनी सेनेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावरती भाष्य केलं ते म्हणाले, 'अनेक सभामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील अस सांगितलं होतं त्यावेळी सेनेनं का विरोध केला नाही.' असा सवाल त्यांनी शिवसेनेला विचारला.

राष्ट्रपती राज्यवटीसाठी आवश्यक सर्व गोष्टी सरकार करतय -

महाविकास आघाडी सरकारच्या लक्षात आलं पाहिजे की राज्यपाल हे संविधानिक प्रमुख असतात. मात्र राज्य सरकार वारंवार राज्यपालांचा आदेश पाळत नाही विधानसभा अध्यक्ष निवडणूक तीन वेळा राज्यपालांनी तारखा जाहीर करुनही राज्य सरकारने ऐकलं नाही त्यामुळे राष्ट्रपती राज्यवट लागू करण्याच्या सर्व गोष्टी हे सरकार करत असल्याचही ते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

वेळ पडल्यास शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन निवडणूक लढवू; चंद्रकांत पाटलांचा इशारा
OBC आरक्षणाशिवाय उद्या 2 जिल्हा परिषद आणि 105 नगर पंचायतींसाठी मतदान !

कोणतेही उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी द्यावी. काही गेले असतील तर त्याची कारण वेगळी आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मुख्यमंत्री असतील हे प्रचाराच्या पहिल्या सभेपासून सुरू होतं. त्यावेळी का विरोध केला नाही. गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत संपादक, संजय राऊत प्रवक्ते, संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते पाहायला मिळाले. सगळ्यांना बाजूला केलं गेलं. त्यामुळे सेनेतील घुसमट बाहेर पडतेय शिवाय उद्या सामनामधून टीका होणार यात शंका नाही असही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com