'संजय राऊत फक्त छिद्र शोधतात; संपूर्ण पोशाख बघत नाहीत'

माझं चॅलेंज आहे 'हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही.
Sanjay Raut/ Chandrakant Patil
Sanjay Raut/ Chandrakant PatilSaamTV

संभाजी पाटील -

मुंबई : 3 टप्प्यांमध्ये केदारनाथ Kedarnath येथील विकास केला जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा आज पूर्ण झाला. केदारनाथमध्ये 2013 साली आलेल्या आपत्तीनंतर या ठिकाणी कोणी पोहचेल असं वाटत नव्हतं. मात्र आता स्रव पूर्ववत होत आहे. 2013 साली मोदी केदारनाथला आल्यानंतर याठिकाणी सुख सुविधा तयार करायच्या त्यांनी ठरवलं होतं. असं सांगतच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी राऊतांसह महाविकास आघाडीवरती टीका केली आहे.

हे देखील पहा -

पाटील म्हणाले 'संजय राऊतांनी Sanjay Raut काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे तसेच पोट निवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या. राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात संपूर्ण पोशाख ते बघत नाही. डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दर आता राज्याने कमी केले पाहिजे. 14 राज्यांनी देखील दर कमी केले. 2024 ला काय करायचे ते जनता ठरवेल शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांचे बघावे असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

Sanjay Raut/ Chandrakant Patil
भाऊबीजेपूर्वी बहिण भावावर काळाचा घाला, भीषण अपघातात भावंडांचा मृत्यू

कोरोनात महाविकास आघाडी सरकारने MVA Goverment जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. केवळ चेक हातात घेऊन फिरत होते. राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते. शरद पवार कसे काय घोषणा करतात. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी घोषणा केली पाहिजे. ST कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह रस्त्यावर उतरू.

इंधनाबाबत ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू, आम्ही कपटे नाही. पण माझं चॅलेंज आहे 'हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही.' असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुर येथे पत्रकारांशी बोलताना केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com