जादूटोण्याच्या संशयावरुन पुन्हा मारहाण; युवकास अटक

जादूटोण्याच्या संशयावरुन पुन्हा मारहाण; युवकास अटक
black magic

चंद्रपूर : जादूटोण्याचा आरोप करत एकास शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा उजेडात आली आहे. सात दिवसांपूर्वी ज्या नागभीड तालुक्यात अशी घटना घडली हाेती, त्याच तालुक्यातील मोहाडी गावात आता दूसरी घटना समोर आल्याने नागरिकांता भीती निर्माण झाली आहे. chandrapur-black-magic-crime-news-sml80

या घटनेत मारहाण झालेल्याचे नाव दिलीप वाघ असे आहे. सोमवारी सायंकाळी वाघ हे आपल्या घरी असताना याच गावातील विकास गजभे (वय १९) याने घरी येऊन तू माझ्या मोठ्या भावावर जादू केलीस असा आरोप करत शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याची नाेंद पाेलिसांत दाखल आहे.

black magic
Satara : पावसामुळे मंदिराचे छत कोसळून एक ठार तर तीन जण गंभीर जखमी

या प्रकरणी नागभीड पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील संशयित आरोपी विकास गजभे यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या १५ दिवसातील जादूटोण्यावरुन black magic मारहाण हाेण्याची ही चौथी घटना आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com