Chandrapur News : १० वर्षाच्या मुलाने केला स्वत:च्या अपहरणाचा बनाव; कारण ऐकून पोलिसही चक्रावले!

बनावट अपहरणाच्या स्टोरीने चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.
Chandrapur Crime News
Chandrapur Crime NewsSaam TV

चंद्रपूर : बनावट अपहरणाच्या स्टोरीने चंद्रपुरात (Chandrapur) खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथील घटनेने पोलीस (Police) आणि पालक देखील बुचकळ्यात टाकलं आहे. एका १० वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव तयार केला. शाळेतून घरी येण्यासाठी उशीर झाल्याने पालक रागवतील म्हणून त्याने अपहरणाची कहाणी तयार केली. टीव्हीवरचे क्राईम शो पाहून या मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा तयार केल्याचे तपासात उघड झाले. (Chandrapur Crime News)

Chandrapur Crime News
Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना जामीन नाहीच; ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम

दरम्यान, मुलगा घरी पोहचल्यानंतर त्याला पालकांनी शाळेतून येण्यासाठी इतका उशीर का झाला अशी विचारणा केली. त्यानंतर मुलाने हा बनाव रचला. मुलाने आपल्या अपहरणाची बनावट कहाणीच वडिलांना सांगितली. मी शाळेतून घरी येत असताना एका मालवाहू ट्रकचालकाने माझं अपहरण केलं. त्याच्या तावडीतून कसाबसा सुटून आलो, अशी कहानी या मुलाने सांगितली.

दरम्यान, मुलाची कहानी ऐकून त्याचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य घाबरून गेले. त्यानंतर त्यांनी मुलाला घेऊन पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. दरम्यान, या मुलाने पोलिसांना देखील अशीच बनावट कहानी सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत सदरील मालवाहू ट्रकचा नंबर आणि मुलाने सांगितलेल्या वेशभूषेवरून ट्रकचालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. (Chandrapur Todays News)

Chandrapur Crime News
Rahul Gandhi : मी मोदींना घाबरत नाही, काय करायचे ते करा; राहुल गांधी संतापले, पाहा VIDEO

मात्र, पोलिसांनी प्रयत्नांची परिकाष्टा करूनही त्यांना अशा प्रकारचा ट्रक कुठेही आढळून आला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले असता, त्यांच्या हाती सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली.

शाळेतून येण्यास उशीर झाला असल्याने आई आणि बाबा रागवतील या भीतीने आपणच स्वत:च्या अपहणाचा बनाव केला असल्याची माहिती या मुलाने पोलिसांना दिली. दरम्यान, मुलाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसही चक्रावून गेले. अगदी सहज दृष्टीस पडणाऱ्या टीव्हीवरील क्राईम सिरीयल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केलाय, याचे हे ताजे उदाहरण म्हटले पाहिजे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com