वीज खांबावरच लोंबकळत राहिला मृतदेह!

खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या तरूणाचा तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली.
वीज खांबावरच लोंबकळत राहिला मृतदेह!
electricity pollsaamtvnews

चंद्रपूर : खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या तरूणाचा तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घडली. रोशन पुंडलीक पाथोडे असे मृतकाचे नाव आहे. जवळपास अर्धा तास त्याचा मृतदेह (DeathBody) खांबावारच लटकलेल्या स्थितीत राहिला.

हे देखील पहा :

नागभिड तालुक्यातील बोथली येथील हा तरूण वीज दुरुस्तीची कामे करायचा. चिखलपरसोडी येथे एका घरातील खंडीत झालेला विद्युत पुरवठा (Electricity) पूर्ववत करण्यासाठी पुंडलीक गेला होता. मुख्य विद्युत लाईनचा पुरवठा खंडित न करता तो खांबावर चढला. दरम्यान, जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार धक्का (Shock) बसला. यात त्याचा मृत्यू झाला.

electricity poll
पिंपरी-चिंचवडमध्ये नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा; पडले आठ टाके!

त्याचा देह खांबावरच लटकत होता. घटना लक्षात येताच गावकरी धावून आलेत. महावितरण (MSEB), पोलीस (Police) विभागाला घटनेची माहीती देण्यात आली. मृतदेह खांबावरून उतरवण्यात आला. उपचारासाठी पुंडलीकला नागभिड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या दुदैवी घटनेने बोथली गावात शोककळा पसरली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com