लाच घेणारी आरपीएफ महिला उपनिरीक्षक गजाआड

तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल
लाच घेणारी आरपीएफ महिला उपनिरीक्षक गजाआड
लाच घेणारी आरपीएफ महिला उपनिरीक्षक गजाआडसंजय तुमराम

चंद्रपूर - जिल्ह्यातील वरोरा शहरात खाजगी संगणक संचालकाने रेल्वे प्रवासाकरिता एका व्यक्तीला ऑनलाइन तिकीट काढून दिले. हे तिकीट नियमबाह्य पद्धतीने काढले म्हणून संगणक संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये तडजोड करण्याकरता 60 हजार रुपयांची लाच घेताना वरोरा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले.

हे देखील पहा -

वरोरा येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलामध्ये गोपिका मानकर उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणात तडजोड करण्याकरिता उपनिरीक्षक गोपिका मानकर यांनी एक लाख रुपयाची मागणी केली. त्यामध्ये साठ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारकर्त्याने याबाबत केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय, नागपूर यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार वरोरा रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला. रात्रीच्या सुमारास 60 हजार रुपयांची लाच घेताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना रंगेहात त्यांच्या कार्यालयात पकडण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.