Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीच्या पोटात केले चाकूने वार; पत्नीचा मृत्यू

चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वेस्टर्न कोल फिल्ड्समधील एका सुरक्षा रक्षकाने धारदार चाकूने वार करुन आपल्या पत्नी व मुलीवरती हल्ला केला आहे.
Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीच्या पोटात केले चाकूने वार; पत्नीचा मृत्यू
Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीच्या पोटात केले चाकूने वार; पत्नीचा मृत्यूSaam TV

चंद्रपूर : चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वेस्टर्न कोल फिल्ड्समधील एका सुरक्षारक्षकाने धारदार चाकूने वार करुन आपल्या पत्नीला व मुलीला जखमी केले आहे या हल्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे तर मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर चंद्रपुरच्या (Chandrapur) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीसह मुलीच्या पोटात केले चाकूने वार; पत्नीचा मृत्यू
Hingoli News: दरोडेखोरांकडून बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न; हवेत गोळीबार!

वीरेंद्र रामप्यारे साहनी वय 43 असे आरोपी पतीचे नावं असून त्याने हे कृत्य आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेतल्याने केल्याचे बोलले जात आहे. घटना वेकोलि ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर-10 क्वार्टर नंबर-77 मध्ये घडली असून आरोपीने पत्नी सुमन वीरेंद्र साहनी वय 36 हिच्या पोटात व छातीत चाकू मारल्यामुळे तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, तर मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी हिला पोटात चाकू भोसकल्याने तिच्यावर चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे देखील पहा -

आरोपीने पत्नी आणि मुलीवरती वार केले आणि तो वसाहतीची भींत ओलांडून विसलोन गावाच्या रेल्वे मार्गाने पळून जात असताना कुचना कॉलोनीतील काही युवकानी पकड़ून त्याला माजरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे कुचना वसाहत परिसर हादरला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com