चंद्रपूर : सहा महिन्यांत रिचवली ९४ लाख लिटर दारू

चंद्रपूरकरांनी सहा महिन्यांत रिचवली ९४ लाख लिटर दारू
चंद्रपूर : सहा महिन्यांत रिचवली ९४ लाख लिटर दारू
liquor

चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू सुरू होताच चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यप्रेमींनी उधाण केले. हे उधाण एवढे उंचीवर गेले की, मागील सहा महिन्यांत मद्यप्रेमींनी चक्क ९४ लाख ३४ हजार ५४२ लिटर दारू रिचवून टाकली. मद्यप्रेमींचा हा कोटा बघून विक्रेतेही जाम खुश आहेत. (Chandrapur-news-94-lakh-liters-of-liquor-delivered-in-six-months)

liquor
तिसऱ्या लाटेत दीडपटीने रुग्ण वाढीचा अंदाज; जानेवारीच्या शेवटी लाट

दारूबंदी (Liquor Ban) उठल्यानंतर सहा महिन्यातच ९४ लाखांची दारूविक्री झाल्याने चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मद्यप्रेमींचे घसा किती कोरडा होता; हेही स्पष्ट झाले. ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर देशी, १६ लाख ५८ हजार ५४२ लिटर विदेशी तर १५ लाख ६३ हजार ४० लिटर बिअर, ३७ हजार ४४९ लिटर वाइन या काळात घशाखाली गेली. या आकडेवारीने चंद्रपूर जिल्हावासीयांनी मद्य पिण्यात बरीच आघाडी घेतल्याचेही दिसून येते.

२०१५ मध्‍ये झाली होती दारूबंदी

एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी (MahaVikas Aaghadi) सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच तहानलेले मद्यप्रेमी दारूवर तुटून पडले. जिल्ह्यात देशी दारूपेक्षा विदेशी दारूची दुकाने अधिक आहेत. मात्र तरीसुद्धा मद्यप्रेमींकडून देशी दारूची मागणी अधिक असल्याचे दिसून आले.

२६४ विदेशी दारू दुकाने

८६ देशी दारू दुकान

३२ बियर शॉपी

८ वाइन शॉप

२ क्लब

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.