Chandrapur News: छेडछाड करणाऱ्या मजनूला चोप; व्‍हीडीओ झाला व्‍हायरल

छेडछाड करणाऱ्या मजनूभाईला चोप; व्‍हीडीओ झाला व्‍हायरल
Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv

चंद्रपुर : सततच्या छेडछाडीने त्रस्त विद्यार्थिनींनी आपल्या पद्धतीने उपाय करत केलेला करेक्ट कार्यक्रम केला. रस्‍त्‍यावरून चालणाऱ्या विद्यार्थिनींची वारंवार छेडछाड (Crime News) करणाऱ्या युवकाची बेदम धुलाई केली. त्यांच्या मदतीला परिसरातील युवक धावून आले. हा व्‍हीडीओ सध्‍या सोशल मिडीयावर (Social Media) चांगलाच व्‍हायरल होत आहे. (Letest Marathi News)

Chandrapur News
Wardha News: CM शिंदेंच्या वाहनाचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; समृद्धी महामार्गाची केली पाहणी

चंद्रपुरात (Chandrapur News) चक्क शाळा परिसरात युवकाने शालेय विद्यार्थिनींची छेड काढली. शालेय विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहापर्यंत पोचून जगणे असह्य करणाऱ्या गावगुंडाचा हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारातच होत असलेला हा प्रकार जागरूक युवकांच्या कानी घातला. यानंतर आरोपीला पकडून बेदम धुलाई करण्यात आली.

व्‍हायरल व्‍हीडीओवरून पोलिसांकडून शोध

व्हायरल व्हिडीओवरून ठिकाण हुडकून पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या भागात सातत्याने शालेय विद्यार्थिनीसंदर्भात छेडखानीचे प्रकार होत असताना विद्यार्थिनींनी स्वतःच उपाय शोधल्याने यापुढे मजनूगिरी करणाऱ्याना जरब बसेल अशी आशा व्‍यक्‍त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com