चंद्रपुरात पुन्हा दारूचा मुद्दा तापला, संतप्त महिलांचा मोर्चा

चंद्रपुरात पुन्हा तापतोय दारू दुकानांचा मुद्दा; महिलांनी काढला मोर्चा
चंद्रपुरात पुन्हा दारूचा मुद्दा तापला, संतप्त महिलांचा मोर्चा
Chandrapur NewsSaam tv

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविली गेल्याच्या निर्णयाला आता वर्ष होत आले आहे. या काळात उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने देशी दारू, बियर शॉप-बार यांचे परवाने मंजूर केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच चंद्रपुरात (Chandrapur) पुन्हा देशी- विदेशी दारू दुकानांचा मुद्दा तापू लागला आहे. (chandrapur news issue of liquor shops in Chandrapur women staged a protest)

Chandrapur News
गॅस सिलेंडरचा स्फोट; तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक

चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयावर आज दारू दुकानांविरोधात महिलांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील दत्तनगर -जगन्नाथ बाबानगर व अन्यत्र नियम डावलून देशी दारू दुकाने व बिअर शॉप वाटल्याचा आरोप महिला आंदोलकांनी केला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Corporation) ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयातील अधिकार्‍यांनी मोठा आर्थिक व्यवहार करत शेकडो दुकाने मंजूर केली आहेत.

तर आंदोलनाची मालिका सुरूच

नियम धुडकावून धार्मिक स्थळे, शाळा आदींच्या जवळही दुकाने मंजूर केल्याने नागरी वस्तीतही आता मद्यपींची दंडेली सुरू झाली आहे. चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. जोवर नियमबाह्य पद्धतीने दिली गेलेली दारू दुकाने बंद होत नाही, तोवर आंदोलनांची मालिका सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त केलाय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.