Chandrapur : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच; एकाच आठवड्यात तीन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. या पुरामळे (Flood) खचलेल्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील तिसऱ्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळले आहे.
chandrapur news
chandrapur news saam tv

चंद्रपूर : जिल्ह्याला महापूराचा मोठा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरले होते. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. या पुरामळे (Flood) खचलेल्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील तिसऱ्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Chandrapur News In Marathi )

chandrapur news
दुर्देवी घटना! चालकाचं नियंत्रण सुटलं अन् प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली!

चंद्रपूर जिल्ह्यात पुराने खचलेल्या शेतकऱ्यांचे मृत्यूला कवटाळण्याचे सत्र सुरूच आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे आज तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या आठवड्यात झालेली तरुण शेतकऱ्याची ही तिसरी आत्महत्या आहे. रवींद्र नारायण मोंढे (४५) यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सतत चारदा पाण्याखाली आलेली शेती यासाठी कारण ठरले.

chandrapur news
Eknath Shinde : पोलिसांच्या घरांसाठी मुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल; दिले 'हे' निर्देश

घरातील कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सेवा सहकारी संस्थेतून शेतीकरिता 70 हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून त्याने शेतात कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. मात्र हा हंगाम कोसळत्या धारा आणि पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने रविंद्र निराश झाला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. या जिल्ह्यात २५ जुलै रोजी वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथे प्रफुल्ल भोयर (३५) या तरुण शेतकऱ्यांने कीटक नाशक पिऊन आत्महत्या केली होती, तर २३ जुलै रोजी राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथे अमित मोरे (२२) या तरुण शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com