Video : चंद्रपुरात वाघाने रुबाबात ओलांडला रस्ता; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एका वाघाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur) ब्रम्हापुरी गावाजवळून ४ किलोमीटर अंतरावर लोकांना हा वाघ पाहायला मिळाला.
Tiger viral video
Tiger viral video saam tv

चंद्रपूर : सोशल मीडियावर एका वाघाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur) ब्रम्हापुरी गावाजवळून ४ किलोमीटर अंतरावर लोकांना हा वाघ पाहायला मिळाला. रस्ता ओलांडण्यासाठी हा वाघ (Tiger) रस्त्याजवळ येऊन थांबला. त्यानंतर रस्त्यावरील सर्व वाहनं थांबली, त्यानंतर या वाघाने रुबाबात रस्ता ओलांडला. हा क्षण उपस्थित अनेकांनी मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Chandrapur Tiger Viral Video News In Marathi)

Tiger viral video
Ashadhi Wari 2022 : पंढरपूरला निघालात ? टाेल माफीसाठी आमच्याशी संपर्क साधा, पाेलीसांचं आवाहन

रुबाबदार वाघाचा व्हिडीओ ट्विटरवर @Sdjoshi55 या ट्विटर हँडलने ७ जुलै रोजी हा व्हिडीओ शेअर केला. त्यांनी हा व्हिडीओ चंद्रपूरच्या ब्रह्मापुरीगावाजवळच्या ४ किलोमीटर येथील असल्याचे सांगितले आहे. ही घटना सहा जुलै रोजी सहा वाजता घडली. सदर व्हिडीओला सहा हजार लाइक्स आणि एक हजार रिट्विट मिळाले आहेत. तर हा व्हिडीओ २ लाख २० हजार जणांनी बघितला आहे.

सदर व्हिडीओ एकूण २९ सेकंदाचा आहे. या व्हिडीओमध्ये वाघ हा रस्त्याजवळ येऊन थांबतो. त्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूकडे पाहतो. रस्त्यावरील सर्व वाहने थांबताच हा वाघ शांततेत रस्ता ओलांडतो. मात्र, या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार वाघाला न घाबरता रस्त्यावरून जातो. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील लोक हा क्षण मोबाइलच्या कॅमेरात कैद करायला विसरले नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार वाघाला न घाबरता पुढे निघून गेला. त्या दुचाकीस्वारावर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका होत आहे. वाघाने हल्ला केला असता तर दुचाकीस्वाराची स्थिती गंभीर झाली असती', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com