कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटण गेले चोरीला!

शेवटी साधी भाजी कार्यकर्त्यांनी तोंड नासवत घश्यात उतरवली! विरोधकांनीच हा कपटीपणा केल्याचा उमेदवाराच्या पतीचा आरोप.
कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटण गेले चोरीला!
कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटण गेले चोरीला! SaamTvnews

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरीत नगर पंचायत निवडणुकीत मजेदार प्रकार पुढे आला आहे.  कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटणच (Mutton) चोरीला गेले. उमेदवाराच्या पतीने प्रचारात रंगत आणण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सात किलो मटण आणलं होतं. एका निर्जन ठिकाणी पार्टीचा (Party) बेत ठरला. सगळ्या साहित्यासह कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. (Chandrapur : Seven kg mutton brought for workers was stolen)

हे देखील पहा :

पण, त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या घशाला कोरड पडली. आधी कोरड घालवायची आणि मग मटण बनवायची, असा प्लॅन करून सगळेच दारू (Liquor) रिचवायला गेले. दारूच्या ओलाव्याच्या खुशीत मटण आणि इतर साहित्य तिथेच पडून आहे, याचेही भान त्यांना राहिले नाही. जेव्हा हे आपला घसा ओला करून परतले, तेव्हा तिथले मटणच गायब होते. तेल-तिखट-मसाला हे सगळं साहित्य मात्र जैसे थे होते. या अजब प्रकाराने उमेदवार पतीच्या आणि कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.

कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी आणलेले सात किलो मटण गेले चोरीला!
पिंपरी-चिंचवडमध्ये नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा; पडले आठ टाके!

शेवटी साधी भाजी कार्यकर्त्यांनी तोंड नासवत घश्यात उतरवली. हा गमतीदार प्रकार गोंडपिपरी शहरातील प्रभाग 15 मध्ये घडला. 18 जानेवारी रोजी इथे नगर पंचायत निवडणूक असून प्रचार शिगेला पोहचला आहे. मात्र, त्याचवेळी घडलेल्या या प्रकाराची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. हे महापाप प्रभागातील विरोधकांचं असल्याची ओरड उमेदवाराचा पती करीत सुटला आहे. त्या पतीदेवाची फजिती झाली असली तरी समाजमाध्यमात (Social Media) या प्रकारावर चांगलीच खसखस पिकली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com