'पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील चुका सुधारण्यासाठी मदत करु'

'पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील चुका सुधारण्यासाठी मदत करु'
chandrashekhar bawankule

- सागर गायकवाड

नाशिक : राज्यातील सरकारने विधान मंडळाचा गैरवापर केला आहे. केंद्राने डाटा द्यावा हा चुकीचा ठराव केला आहे. कोणीतरी झरीतील शुक्राचार्य आहे. त्याला ओबीसी आरक्षण obc reservation नको आहे. ओबीसी आरक्षणा व्यतिरिक्त 2022 च्या निवडणूक करायच्या आहेत. विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ हे आंदोलन, मोर्चे काढताहेत. याविषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. त्यामुळे संशय येतोय असे चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केले. chandrashekhar-bawankule-addressed-media-obc-reservation-imperical-data-sml80

चंद्रशेखर बावनकुळे हे आज नाशिक येथे आहेत. भाजपा युवा माेर्चाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताेफ डागली.

ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. नाशिक येथील एका भाजपा युवा माेर्चाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताेफ डागली. ते म्हणाले 'ओबीसींना मिळालेलं २७ टक्के आरक्षण टिकण्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात याचिकेला काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता. आम्ही उच्च न्यायालयात योग्य मांडणी केल्याने न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्याविरोधात काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयात गेले.

याबराेबरच ३१ जुलै २०१९ कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण obc reservation टिकवले. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळं हा अध्यादेश टिकला नाही असा आराेप बावनकुळेंनी केला.

ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारने बाजू मांडलीच नाही. राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा तयार करावा असे निर्देश न्यायालायने दिले होते. तरीही विधान मंडळाचा गैरवापर करून केंद्राने हा डेटा द्यावा असा बेकायदेशीर ठराव करण्यात आला. खरं तर यामध्ये केंद्राचा सुतराम देखील संबंध नाही,' असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

chandrashekhar bawankule
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, कार्याध्यक्षासह 11 जणांवर गुन्हा

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात झारीचा शुक्राचार्य आहे. त्याच्याकडूनच ओबीसी आरक्षणाला मुद्दाम उशीर केला जात आहे. फक्त तीन महिन्यांत आरक्षणाचा डेटा तयार होऊ शकतो. फडणवीस सरकारनेही तीन महिन्यांत मराठा आरक्षणाचा डेटा तयार केला होता. ओबीसीचे २७ टक्के आरक्षण टिकवले होते. आम्ही आरक्षण घालवले असते तर निवडणूक झाल्याच नसत्या असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत नाहीत. पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan यांच्या कार्यकाळातील आकडेवारीत ६९ लाख चुका असल्याचा आराेप बावनकुळेंनी केला आहे. दरम्यान हा डेटा तयार करण्यासाठी भाजप नेेत महाविकास आघाडी सरकारला मदत करतील अशी ग्वाही बावनकुळेंनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com