Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या रक्तात विकासाचं व्हिजन नाही, 'रडोबा' झालेत; भाजप नेत्याची जहरी टीका

Chandrashekhar Bawankule's Criticism on Uddhav Thackeray: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv

Political News: सत्तासंघर्षावर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने आपला निकाल जाहीर केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप-शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नंगानाच सुरू आहे त्याला चाप लावा, असं आवाहन केलं आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे. (Political Latest News)

उद्धव ठाकरे हे 'रडोबा' झाले आहेत. बाळासाहेब हे लढवय्ये होते. रणांगणातून तुम्ही पळून गेले आहात. नैतिकता उद्धव ठाकरेच्या तोंडून चांगलं वाटत नाही. नैतिकता यांनी तेव्हाच सोडलीय. पक्ष प्रमुख म्हणून तुम्ही फेल गेले. जेव्हा तुमच्या पक्षातून लोक निघून गेले, घरातला भाऊ निघून गेला. असं तोंडसूख बावनकुळेंनी ठाकरेंवर घेतलं आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालय राज्यपालांच्या भूमिकेवर नेमके काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यावर प्रत्युत्तर देत बावनकुळे म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकले नाही आणि पक्षाला ही नेतृत्व देऊ शकले नाही. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हाच संविधानिक सरकार तयार झालं. उद्धव ठाकरे वारंवार असंविधानिक सरकार म्हणात आहेत, मग त्या विरोधात आम्हाला कोर्टात जावं लागेल, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे.

मंत्री मंडळ विस्तारावरून पुढे बावनकुळे म्हणाले की, मंत्री मंडळ विस्तार करणे हा पूर्णतः एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष गेला तरी ते सुधारत नाहीत. त्यांच्या बाजूला जे चार पाच जण आहेत त्यांच्यात ते अटकले आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: ठाकरे की शिंदे, कोणाचा व्हीप लागू होणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

उद्धव ठाकरे रडल्यासारखं भाषण देतात

उद्धवजींना आता रडण्याशिवाय काही उरलेले नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रडल्यासारखं भाषण देतात. ते राडोबा झाले आहेत. स्वतः शरद पवार साहेबांना असं वाटत आहे की माझा निर्णय चुकला. महाविकास आघाडीचा नेता निवडण्यात चूक झाली. उद्धव ठाकरेंच्या ब्लडमध्ये विकासाचं व्हिजन नाहीये, अशी जहरी टीरा बावनकुळेंनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com