'...तर ॲाफर न स्विकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत'
'...तर ॲाफर न स्विकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत'Saam Tv

'...तर ॲाफर न स्विकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत'

भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रातून ऑफर मिळाल्याची माहिती होती.

संजय डाफ

नागपूर : भाजपसोबत सरकार BJP-NCP बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांना केंद्रातून ऑफर मिळाल्याची माहिती होती. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी आपली याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ''आमच्यासोबत सरकार बनवा अशी ऑफर पवारसाहेबांना केंद्राने दिली होती, तर ती ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब हे कच्च्या गुरुचे चेले नाहीत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार हे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे ते आणि त्यांचे शिष्य काहीही झालं तर केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मग तो कोळसा कमी असोत, की इतर काहीही.

हे देखील पहा-

'जर पवार यांना केंद्राची ॲाफर होती, तर ॲाफर न स्विकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत. केंद्रात सत्ता असलेल्या पक्षासोबत जाणे, ही त्यांनी निवड केली असती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना पवार काय बोलतात हे कळते. महाविकास आघाडीतील नाराजी आपल्या पदरात काही टाकून घेण्यासाठी असते. त्यावरून काही निष्कर्ष काढण्याची गरज नाही.'

'महिलांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करायची आहे. देवेंद्र जी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या गुन्ह्यांवर सर्व बोलायचे, आता नितीन राऊत झोपा काढतात का? त्यांना नागपूरातील गुन्हेगारी कळत नाही का? महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहे. महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र सुरक्षित होता. पण आता महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्र रसातळाला गेलाय. माझ्या काळात सुप्रिया सुळे खड्ड्यांसोबत सेल्फी काढायच्या, आता त्यांना महिला- मुलींसंदर्भातील गुन्हे, कोयत्याने वार करणे दिसत नाही का?'

'...तर ॲाफर न स्विकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत'
Beed: गैरहजर सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्रा बसवून ग्रामस्थांनी केला निषेध!

दरम्यान, काल (ता. १२) देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटतं की मीच मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत देखील चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणे चुकीचा अर्थ लावला गेला आहे. "जनता आजही मी मुख्यमंत्री असल्यासारखी अपेक्षा करते, जे त्यांना मराठवाड्याच्या प्रवासात जानवलं" आजही मला लोकांमध्ये गेल्यानंतर वाटतं की, मीच मुख्यमंत्री आहे. हे उद्धव ठाकरेंना जमत नाही'', लोकांना उद्धवजींकडून अपेक्षा नाही, ते नाही बाहेर पडणार, हे जनतेनं गृहित धरलंय. प्रत्येक वेळेला देवेंद्र जी फिल्डवर आहे. त्यामुळे लोकांना ते मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं. असा फडणवीस यांच्या बोलण्याचा खरा अर्थ चंद्रकांत पाटील यांनी सांगितला आहे.

Related Stories

No stories found.