
- अमर घटारे
Chandur Railway Bajar Samiti News : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश आरेकर (ganesh aarekar) यांची तसेच उपासभापतीपदी रवींद्र देशमुख (ravindra deshmukh) यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर दाेन्ही नूतन पदाधिका-यांच्या समर्थकांनी त्यांचे जाेरदार घाेषणाबाजी करीत अभिनंदन केले. (Breaking Marathi News)
अमरावती (amravati) जिल्ह्यात सहा बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप (former mla virendra jagtap) यांचे 17 तर भाजप समर्थित पॅनलला 1 जागा मिळाली.
दरम्यान या बाजार समितीच्या सभापती आणि उपसभपतीच्या निवडी बिनविराेध झाल्या. सर्व संचालकांनी मिळून सभापतीपदी गणेश आरेकर आणि उपासभापतीपदी रवींद्र देशमुख यांची निवड केली. यावेळी नूतन पदाधिका-यांनी एकमेकांना पेढे भरविले. तसेच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत निवडीचे स्वागत केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.