डॉ. भागवत कराड हे मंत्रीपदाची शपथ घेताना जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्रीमंडळात डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागताच औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र जल्लोष करताना कोरोना नियमांचे पालन केले नसल्यानं भाजपच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. भागवत कराड हे मंत्रीपदाची शपथ घेताना जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
डॉ. भागवत कराड हे मंत्रीपदाची शपथ घेताना जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलsaam tv news

औरंगाबाद- केंद्रीय मंत्रीमंडळात डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागताच औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र जल्लोष करताना कोरोना नियमांचे पालन केले नसल्यानं भाजपच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादचे राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा शपथविधी सोहळा सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी भाजपच्या उस्मानपुरा कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला. औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागातल्या भाजपच्या कार्यालयासमोर मोठी स्क्रीन लावण्यात आली होता. कराड यांनी शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. त्यामुळे वेदांत नगर पोलिस ठाण्यात ५० ते ६० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

कोण आहेत डॉ. भागवत कराड?

डॉ. कराड हे लातूर जिल्ह्यातील चिखली (ता. अहमदपूर) गावचे मूळ रहिवासी आहेत. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. एमबीबीएस, एमएस, एमसीएच, एफसीपीस अशा पदव्या त्यांच्याकडे आहेत. औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे दोन वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. मराठवाड्यात भाजपाला बळ देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा मोठा राजकीय प्रवास आहे.

डॉ. भागवत कराड हे मंत्रीपदाची शपथ घेताना जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
बोगस 'देवमाणूस' ; आदिवासी तरुणीवर केली मेंदूची शस्त्रक्रिया

मुंडे यांचे कट्टर समर्थक

डॉ. कराड बालरोगतज्ज्ञ आहेत. वैद्यकीय पेशा सांभाळून ते १९९५ साली राजकारणात आले. महापालिकेत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी डॉ. कराड यांना राजकारणात ताकद दिली आणि ते औरंगाबाद महापालिकेत दोनवेळा महापौर झाले. गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com