सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल...

उपविभागीय अधिकारी कोळी यांनी दिला कारवाईचा इशारा...
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल...
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल...संजय जाधव

बुलढाणा - दोन भिन्न समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस सोशल मीडियावर ठेवणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून शेगाव शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. युवकांनी सोशल मीडियावर असताना कुठलेही आक्षेपार्ह स्टेटस अथवा व्हिडीओ पोस्ट करू नये असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये सुरू असलेल्या दंगली भांडण-तंटे यानंतर सर्वत्र शांतता प्रस्थापित झालेली असताना बुलढाणा जिल्ह्यात अनेक शहरांमध्ये काही युवक सोशल मीडियाच्या माध्यमाने दोन समाजात तेढ निर्माण होईल हा उद्देश समोर ठेवून आक्षेपार्य व्हिडिओ फोटो पोस्ट स्टेटसवर ठेवून आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने पोस्ट करून प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा -

यासंदर्भात आता पोलिसांनी अशा या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये खामगाव विभागांतर्गत येणाऱ्या शेगाव शहर पोलीस स्टेशन आणि जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेख इरफान शेख हाशम, असलम खान, अफसर खान, नागेश गावंडे आणि अजय घुगे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल...
गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचे छापे; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त!

नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ फोटो सोशल मीडियाच्या माध्यमाने पसरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी युवा सेनेशी बोलताना दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com