त्या क्लिपमधील आवाज छिंदमचाच, अखेर दोषारोपपत्र दाखल

त्या क्लिपमधील आवाज छिंदमचाच, अखेर दोषारोपपत्र दाखल
श्रीपाद छिंदम

नगर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यामुळे नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम देशात कुपरिचित आहे. त्याच्या वक्तव्यामुळे राज्यभर आंदोलन झाले. त्यामुळे भाजपने त्याला पक्षातून निलंबित केलं होतं. नंतर त्याला शासनाने बरतर्फ केलं. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर आज (सोमवारी) त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाले.

पोलिसांनी न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. छिंदम याने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना दूरध्वनी करून वाद घातला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या संभाषणाची ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमुळे महाराष्ट्रभर एकच गदारोळ उडाला होता. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. Chargesheet filed against Shripad Chhindam

श्रीपाद छिंदम
एसटी आगारात तरी मेंटेनन्सचे मीटर सुसाट! खर्च तब्बल 4 कोटी

छिंदम हा महापालिकेच्या उपमहापौर या शासकीय पदावर असल्याने भारतीय दंड संहिता कलम १९६ (१) (अ) प्रमाणे तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी शनिवारी परवानगी दिल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी आज (सोमवारी) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ६० पानांच्या या दोषारोपपत्रात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत.

क्लिपमधील नमुने जोडले

पोलिसांनी ऑडिओ क्‍लिपमधील आवाज आणि श्रीपाद छिंदम याच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आला आहे. तोदेखील पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे.

छिंदमच्या भावावरही गुन्हे

श्रीपाद व श्रीकांत छिंदम हे दोघे भाऊ आहेत. त्यांची परिसरात दादागिरी केल्याचे अनेक गुन्हे आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची हिस्ट्री सर्वांना माहिती आहे. बेकायदा जमाव जमवून त्यांच्याद्वारे मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. दोघांवर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. आठ दिवसांपूर्वीच त्याने एका दुकानदाराला शिवीगाळ केली होती. त्यावरून त्याच्यावर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला आहे.Chargesheet filed against Shripad Chhindam

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com