Chatrapati Sambhaji Nagar : मढी यात्रेसाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला! गोदापात्रात बुडालेल्या चारही तरुणांचा मृत्यू

Chatrapati Sambhaji Nagar News:छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर रोडवरील कायगाव टोका येथील प्रवरासंगम गोदावरी नदीत चार जण बुडाल्याची घटना घडली आहे.
Chatrapati Sambhaji Nagar News
Chatrapati Sambhaji Nagar NewsSAAM TV

Chatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगाव टोका येथे सिध्देश्वर मंदिराजवळ गोदावरी नदीत चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की वैजापूर तालुक्यातील काही तरुण कावडीने पाणी नेण्यासाठी कायगाव येथे आले होते. दरम्यान आंघोळीसाठी गोदावरीत उतरल्याने त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

Chatrapati Sambhaji Nagar News
Chatrapati Sambhaji Nagar : मढी यात्रेसाठी निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला! गोदावरी पात्रात 4 जण बुडाले

बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), आकाश भागिनाथ गोरे (वय 20) आणि शंकर पारसनाथ घोडके (वय 22) अशी पाण्यात बुडालेल्या चार तरुणांची नावे आहेत. हे चौघेही वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहेत.

Chatrapati Sambhaji Nagar News
Truck Fare In Nagpur : सुरुची मसाल्याच्या ट्रकला भीषण आग, पाहता पाहता झालं होत्याचं नव्हतं

शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अन्य तिघांचे मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com