मुसळधार पावसामुळे चतुरबेट पूल पाण्याखाली; 15 गावांचा संपर्क तुटला

हा पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास 15 गावांचा संपर्क आता तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे चतुरबेट पूल पाण्याखाली; 15 गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे चतुरबेट पूल पाण्याखाली; 15 गावांचा संपर्क तुटलाओंकार कदम

ओंकार कदम

सातारा - मुसळधार पावसाचा Rain जोरदार तडाखा महाबळेश्वर Mahabaleshwar तालुक्याला बसला असून तालुक्यातील जनजीवन आता विस्कळीत होऊ लागले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने महाबळेश्वरचा वेण्णा लेक Veena Lake तलाव काल पासूनच ओसंडून वाहू लागल्याने तलावाचे सर्व पाणी बाहेर रस्त्यावर आल्याने काल काही काळ महाबळेश्वर कडून पाचगणी कडे जाणारी वाहतूक Transportation ठप्प झाली होती नंतर ही वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली.

हे देखील पहा -

तसेच या पावसाने महाबळेश्वर तालुक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी शिरू लागले आहे.प्रतापगड भागात सुद्धा पावसाचा जोर अधिक असल्याने या भागातील चतुरबेट पूल आता पाण्याखाली गेला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास 15 गावांचा संपर्क आता तुटला आहे. घोणसपूर, शिंदेवाडी, शिरणार आणि दाबे या प्रमुख गावांचा संपर्क तुटला असून या पुलावरून पाण्याचा वाहणारा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com