स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवरील कर्जाची फडणवीसांकडून कर्जमुक्तता

लोणकर कुटुंबावरील दु:खाचा नाही मात्र कर्जाचा डोंगर खाली झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 19.96 लाखांचा धनादेश सुपूर्द; लोणकर कुटुंबीयांना मोठा दिलासा.
स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवरील कर्जाची फडणवीसांकडून कर्जमुक्तता
स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवरील कर्जाची फडणवीसांकडून कर्जमुक्ततारामनाथ दवणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन सुद्धा आयोगाने मुलाखतीसाठी केलेल्या दिरंगाईमुळे, तसेच स्वत:च्या भविष्याबाबतच्या अनिश्चितेच्या काळजीतून जे नैराश्य आले आणि त्यातूनच स्वप्निलने आत्महत्या केली. Checks from Fadnavis for debt relief on Swapnil Lonakar's family

स्वप्निलच्या निधनामुळे (Swapnil lonkar death) त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर तर कोसळलाच मात्र स्वप्निलच्या शिक्षणासाठी लोणकर कुटुंबियांनी काढलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाच्या बोजामुळे(Loan) आणखीनच या कुटुंबाची फरफट चाचली होती.

हे देखील पहा -

दु:खाचा नाही मात्र कर्जाचा डोंगर तरी झाला खाली

मात्र आज या कर्जाची परतफेड करणारा धनादेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition Leader Devendra Fadanvis) यांनी लोणकर कुटुंबीयांकडे सुपूर्द केला यामुळे या कुटुंबावरील दु:खाचा नाही मात्र कर्जाचा डोंगर तरी खाली झाला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले ज्या पतसंस्थेचे कर्ज लोणकर कुटुंबावर होते ही पतसंस्था एका राजकीय पक्षाशी संबंधित होती मात्र तिने लोणकर कुटुंबावर संकट कोसळले असतांना कर्ज कमी केले नाही.आम्ही लोणकर कुटुंबासोबत पुढे ही राहू असे फडणवीस म्हणाले.

स्वप्नील लोणकर यांच्या वडिलांनी मानले भाजपचे आभार...

महाराष्ट्रात पुन्हा स्वप्नील लोणकर(swapnil Lonkar) सारखी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये याआठी आम्ही प्रयत्न करू असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर स्वप्नील लोणकर यांच्या वडिलांनी भाजपच्या या मदतीसाठी आभार व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचे(Fadanvis Birthday) औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील लोणकर यांच्याकडे 19 लाख 96 हजार 965 रूपयांचा धनादेश भाजपातर्फे देण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे लोणकर कुटुंबीयांवरती कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींगचा व्यवसाय बंद आणि अशातच पतसंस्थेकडून कर्जाचा पैशासाठी तगादा यामुळे हे कुटुंब जास्तीच आधारहीन आणि दिशाहीन झाले होते.

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवरील कर्जाची फडणवीसांकडून कर्जमुक्तता
आदिवासी विकास मंत्र्यांचा जिल्‍हाच खावटीपासून भुकेला; कुटुंबापर्यंत पोहचला नाही लाभ

अशातच आज या कर्जाची रक्कम लोणकर कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा धनादेश देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,(Pravin Darekar) गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर,(Gopichand padlkar) मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com