आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावरून छगन भुजबळांची नाराजी, म्हणाले...

.... म्हणजे जिल्हाप्रशासन आणि अन्य खात्यांवर अन्याय करण्यासारखं आहे असे छगन भुजबळ म्हणाले.
chhagan bhujbal
chhagan bhujbalsaam tv

नाशिक: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यावर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरेंनी आधी चौकशी करावी, आदिवासी पाड्यांवर अगोदरपासून काम सुरु आहे. काम अगोदरच सुरू झालेलं असताना हे काम शिवसेनेने केलं हे दाखवणे चुकीचं आहे. हे म्हणजे जिल्हाप्रशासन आणि अन्य खात्यांवर अन्याय करण्यासारखं आहे असे छगन भुजबळ म्हणाले.  

श्रेय कुणीही घ्या, पण काम अगोदरच सुरू झालेलं आहे. कुठल्याही कामाला 2- 3 महिने जावे लागतात. मंत्र्यांना मिसलीड केलं जातं, स्थानिक नेत्यांनीही आपल्या नेत्यांना मिसलीड करू नये आणि तिथे नेऊन बसवू नये असे म्हणत छगन भुजबळ यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना टोला लगावला आहे.

chhagan bhujbal
रोहित शर्माची नजर विश्वविक्रमावर, आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळण्यावर ठाम!

छगन भुजबळ यांनी यावेळी केतकी चितळेने केलेल्या पोस्टवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. अभिनेत्री अथवा कुणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे चीड आणणारे, यामागे मनुवाद आहे का? तपासलं पाहिजे. लहान समाजाचं दुःख त्या कवितेतून मांडलंय. कडक कारवाई झाली पाहिजे, अशा लोकांना ताबडतोब सोशल मीडियाने कायमस्वरूपी बॅन केलं पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभा होणार आहे. त्याला छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंचे दिवसभर काम सुरू असते. अतिशय चांगलं काम ते करत आहेत. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला शुभेच्छा, महागाई आणि इतर प्रश्न सोडून भगव्याचं राजकारण सुरु आहे. प्रत्येकाच्या मनात आपआपले देव आहेत. विरोधकांचा याचा राजकारणात वापर करून इतर प्रश्न लपवण्यासाठी वापर केला जातोय असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com