Chhagan Bhujbal: प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशकात छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजारोहण, सोहळा साधेपणाने साजरा

नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day) मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam Tv

नाशिक : नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day) मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर अत्यंत साधेपणानं हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील परेड रद्द करण्यात आली तर पुरस्कारार्थी पोलीस अधिकाऱ्यांचा पुरस्कार सोहळा देखील रद्द करण्यात आला (Chhagan Bhujbal Hoisted Flag On Republic Day At Nashik).

Chhagan Bhujbal
Ajit Pawar: केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष, त्यावर राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत विचार होईल - अजित पवार

ध्वजारोहण सोहळ्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वीरमाता आणि विरपत्नींची भेट घेऊन त्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जमिनीचं वितरण करण्यात आलं. तर ग्रामीण पोलीस दलात नव्यानं दाखल झालेल्या 4 नवीन गाड्यांना भुजबळांनी हिरवा झेंडा दाखवला.

मविआच्या शासनाने शिवभोजन कार्यक्रम सुरू केला

"भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, नाशिकचे दीडशे वर्ष देखील साजरे होत आहेत. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचे (Corona) सावट आहे. मविआच्या शासनाने शिवभोजन कार्यक्रम सुरू केला. शहरी भागात 45 तर ग्रामीण भागात 45 केंद्र आहेत. 36 कोटी 42 लाखांचे अनुदान कोरोना काळातील मृतांच्या नातेवाईकांना आपण दिलं. दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं आहे".

Chhagan Bhujbal
Republic Day 2022: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मालेगावात कोरोना रोखला, याचं शास्त्रीय कारण शोधलं जात आहे - भुजबळ

"मालेगावमध्ये कोरोना रोखला गेला, याचे शास्त्रीय कारण शोधलं जात आहे. याबाबतचा अभ्यास पूर्ण, लवकरच काय कारण हे जगा समोर येईल. पोलीस आयुक्तांनी शहरात नो पेट्रोल नो हेल्मेट ही मोहीम यशस्वीपणे राबवली जाते आहे. नाशिक (Nashik) महापालिकेच्या वतीने स्मार्ट स्कुल अभियान सुरू केलंय. नमामी गोदा मोहिमेच्या माध्यमातून गोदा स्वच्छतेचे उपक्रम सुरू आहे", असं छगन भुजबळ म्हणाले.

"शहरात वैदकीय यंत्रणा बळकट करण्याचे प्रयत्न आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन लोकहितवादि मंडळाने यशस्वी करून दाखवले", असंही ते म्हणाले.

मालेगाव महापालिकेच्या काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भुजबळांचं मौन धरलं. मिश्किल हसत मला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com