मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले,'तुमच्या पक्षातही...'

पंडित नेहरूंपासून ते सावरकरांपर्यंत अनेक जण लढले. कोण पंतप्रधान होईल कोण मंत्री होईल हे माहीत नसताना सगळे लढले.
Chhagan Bhujbal And PM Narendra Modi
Chhagan Bhujbal And PM Narendra ModiSaam TV

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे गांधी परिवाराबाबत बोलत असतील तर ते चुकीचं आहे. आज जे मंत्री, नेते दिसताय त्यांना घराणेशाहीचा इतिहास आहे. यांच्या सरकारमध्ये देखील घराणेशाही आहे त्यांनी बघावी असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनामित्त केलेल्या भाषणामध्ये घराणेशाहीबाबत वक्तव्य केलं.

पंतप्रधान म्हणाले, जेव्हा मी घराणेशाही आणि घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकारणावर बोलत आहे. दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातील दुष्टाईने भारतातील प्रत्येक संस्थेत कुटुंबवाद पोसला आहे. ही मानसिकता जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होत नाही, त्यांना सामाजिकदृष्ट्या तुच्छतेने पाहण्यास भाग पाडत नाही तोपर्यंत संपणार नाही.'

पाहा व्हिडीओ -

त्यांच्या याच वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'देशाचं स्वांतत्र्य आपोआप आलेलं नाही तर अनेकांनी बलिदान दिलं आहे. पंडित नेहरूंपासून ते सावरकरांपर्यंत अनेक जण लढले. कोण पंतप्रधान होईल कोण मंत्री होईल हे माहीत नसताना सगळे लढले. ही सगळी माहिती समोर आली होती. पुस्तकामध्ये इतिहास असावा मात्र आजकाल इतिहास वगळला जात आहे.

पंतप्रधन सगळ्यांना बरोबर घ्या, असं बोलले त्याचं मी स्वागत करतो. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घ्यायला हवं. मात्र, त्यांच लोकांनी त्याची अंमलबजावनी करावी गांधी घराण्याबद्दल बोलत असतील तर राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच बलिदान विसरता येणार नाही. गांधी परिवार बोलत असतील तर ते चुकीचं आहे. आज जे मंत्री नेते दिसताय त्यांना घराणेशाहीचा इतिहास आहे. यांच्या सरकारमध्ये देखील घराणेशाही आहे त्यांनी बघावी असंही भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal And PM Narendra Modi
Chandrakant Patil : महसूल खातं न मिळाल्यानं नाराज आहात का? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

राज्य सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाले ही चांगली गोष्ट आहे. कोणते प्रश्न कुणाकडे मांडवे समजत नव्हतं अर्ध्या पेक्षा कमी मंत्री आहेत, परत बदल होतील. २४ खाते अजून वाटपाचे बाकी आहेत, त्यात होईल काही भाजपकडे जागा जास्त त्यांच्या कडे जास्त जागा आहे त्यात चुकीचं काय शिवाय मुख्यमंत्री सगळ्या खात्याचा प्रमुख असतो. आम्ही सत्तेसाठी आलो नाही असं ते अगोदर बोलत होते मग आता का ओरड करत आहेत असं म्हणत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com