Chhagan Bhujbal: 'ज्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत'

'पवारसाहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर मविआची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे.'
Chhagan Bhujbal: 'ज्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत'
Chhagan Bhujbal: 'ज्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत'Saam TV

नाशिक : येणाऱ्य़ा महापालिका निवडणूका एकत्र लढविण्याचे महाविकासआघाडीच्या सर्वोच्च नेत्यांच मत आहे. मात्र काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत, आम्ही स्थानिक नेत्यांसोबत बैठका घेऊन तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सगळे मतदार संघ लढवण्याच्या दृष्टीने आपली तयारी पाहिजे आशा सूचना देखील दिल्या असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे केलं आहे.

तसंच मविआचे (MVA) जे पक्ष सन्मानाने आमच्या सोबत बसतील आणि चर्चा करतील त्यांच्याशी चर्चा करून कोणा सोबत जायचं ते बघू चर्चा करण्यासाठी आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत असंही भुजबळ म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील एकत्र लढण्याबाबत विचारणा केली आहे. आम्ही आमची तयारी असल्याचे सांगितलं असून सगळीकडे तयारी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कुणाला वाटत असेल स्वबळावर जावं तर तो त्यांचा प्रश्न, नाही झालं तर निवडणुकीनंतर एकत्र येता येईल असंही ते काँग्रेसने (Congress) केलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला उद्देशुन म्हणाले.

दरम्यान पडळकरांनी केलेल्या टीकेवरती बोलताना भुजबळ म्हणाले पवार साहेबांची एलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे असे फक्त शरद पवार (Sharad Pawar) आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर मविआची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी असून पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत त्य़ामुळे त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला अस कोणी जाहीर केलेला नाही. मात्र या संपामुळं मिलमधले लोक देशोधडीला लागले आहेत त्यामुळे एसटी संपाबाबत (ST Strike) एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. आणि कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याच ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com