Chhatrapati sambhaji Nagar: आता गय नाही! आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांनी सावध राहा; सायबर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

सायबर पोलीस ठाण्याचे पथक 24 तास सोशल मीडियावर बारीक नजर ठेऊन आहेत.
Chhatrapati sambhaji Nagar
Chhatrapati sambhaji NagarSaam Tv

नवनीत तापडिया

chhatrapati sambhaji nagar News: दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्टचे प्रमाण सोशल मीडियावर वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट टाकल्यामुळे अनेक भागात सामाजिक वातावरण गढूळ होत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

यामुळे पोलीस यंत्रणा देखील आता अधिक अलर्ट झाली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पथक 24 तास सोशल मीडियावर बारीक नजर ठेऊन आहेत. तर ग्रामीण पोलिसांनी एक जानेवारी ते 17 एप्रिल पर्यंत 80 जणांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

कुठेही विवादीत पोस्ट आढळल्यास सायबर पोलीस त्वरित त्या मोबाईल धारकावर कारवाई करित आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही, अशा भूमिकेत शहर आणि ग्रामीण पोलीस दिसत असून, यामूळे आता सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना अनेकदा विचार करूनच ती पोस्ट करावी अन्यथा एक चुकीच्या पोस्टमूळे कारागृहाची हवा खाण्याची वेळ येऊ शकते.

Chhatrapati sambhaji Nagar
Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे महापालिकेने मालमत्ता करात दिली मोठी सवलत; चंद्रकांत पाटील यांची माहिती

शहर पोलिसांनी देखील आता एक मोहीम हाती घेतली असून, 24 तास एक पथक फक्त आणि फक्त सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहे. सामाजिक तेढ आणि धार्मिक भावना दुखवणारी कुठलीही पोस्ट असेल तर त्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जाणार आहे.

ग्रामीण पोलिसांनी तर या सर्व घडामोडींवर अगोदरपासूनच कारवाई करण्याला सुरुवात केली असून, ग्रामीण पोलिसांकडून 24 तास सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तसेच सोशल मिडीयाचे माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावुन दोन समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेटस, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकुर, एसएमएस, तयार करून प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे.

तर आतापर्यंत अशा 80 लोकांवर गेल्या तीन महिन्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना कारागृहाची हवा खावी लागत आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या नागरिकांची गय केली जाणार नाही त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी सामाजिक तेढ निर्माण होईल कुणाच्या भावना दुखावल्या जाईल अशा पोस्ट करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे.

Chhatrapati sambhaji Nagar
Cabinet Meeting Decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वाचा बैठकीतील 12 महत्त्वाचे निर्णय

पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि कारवाईनंतर आता नागरिक सुधारतील का? आणि असल्या पोस्ट टाकणे बंद करतील का? हे येणाऱ्या काळात पहावे लागेल, तर पोलिसांचे 24 तास नजर ठेवून असणारे पथक यामध्ये अजून किती लोकांना कारागृहाची हवा खायला लावतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com