Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री २ गटात राडा; पोलीस अॅक्शन मोडवर, ३०० ते ४०० अज्ञातांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगरच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आहे.
Chhatrapati sambhaji nagar News
Chhatrapati sambhaji nagar News Saam Tv

नवनीत तापडिया

Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. दोन गटात झालेला राडा झाल्यानंतर परिस्थिती निवळली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३०० ते ४०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोन गटात तुफान राडा झाला. जिल्ह्यातील किराडपुऱ्यातील दोन गटात राडा झाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी (Police) ३०० ते ४०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात कोणते कलम दाखल करण्यात आले, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Chhatrapati sambhaji nagar News
Mumba Devi Mandir : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास; CM एकनाथ शिंदेंचे आश्वासन

सर्वांनी शांततेत सण साजरे करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी स्थानिक पोलिसांशी बोललो आहे, आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. आज रामनवमी आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की सर्वांनी शांततेत सण साजरे करावे. आजपर्यंत जसे सर्व सण एकोप्याने साजरे करत आलो, तसेच आपण सर्व सण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

सर्वांनी शांतता बाळगावी; देवेंद्र फडणवीसांनी केले आवाहन

छत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोक प्रक्षोभक वक्तव्ये करून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कुणी असे चुकीचे वक्तव्ये करत असतील तर त्यांनी ते करू नये. सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केल आहे.

Chhatrapati sambhaji nagar News
Corona New Variant : महाराष्ट्रासह ११ राज्यांत पसरतोय करोनाचा नवा व्हेरियंट; तज्ज्ञ म्हणाले, श्वसनाचे विकार...

सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर आता परिस्थिती निवळली आहे. परंतु आता या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी यामागे भाजप आणि एमआयएम असल्याचा आरोप केला आहे, तर चंद्रकांत खैरे यांनी हे राज्य सरकारचं अपयश आहे असे म्हटले आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com